जळगाव गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : 45 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणार्‍यांना बेड्या


Jalgaon Crime Branch’s big achievement : Kidnappers for ransom of Rs 45 lakhs arrested जळगाव (3 मे 2025) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खंडणीसाठी अपहरण करणार्‍यांना बेड्या ठोकल्या आहेत तर अपहरण करणार्‍यास जखमी अवस्थेत लासलगाव जंगलातून ताब्यात घेण्यात आले. 45 लाख रुपयांच्या खंडणीसाठी चाळीसगाव तालुक्यातील इसमाचे अपहरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

चाळीसगाव तालुक्याच्या वाघले येथील रहिवासी गणेश ताराचंद राठोड यांचे अपहरण झाले होते. या अपहरण प्रकरणी 30 रोजी त्यांचा मुलगा अनिल राठोड याने अनोळखी इसमाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. गणेश राठोड यांना मारहाण होत असल्याचा व्हिडीओ त्यांच्याच मोबाईलवरुन त्यांच्या मुलाला पाठवला जात होता. तसेच व्हाईस कॉल करुन त्यांना 45 लाख रुपयांची खंडणी देखील मागीतली जात होती.

या घटनेत गणेश राठोड यांचे नेमके कुठून अपहरण झाले आहे याचा थांगपत्ता लागत नव्हता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रीक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे जयेश दत्तात्रय शिंदे (रा.सैनिक कॉलनी, चाळीसगाव) आणि श्रावण पुंडलिक भागोरे (रा.स्वामी विवेकानंद कॉलनी, नांदगाव जि.नाशिक) या दोघांची नावे निष्पन्न करण्यात आली. दोघे जण मौजे मोझर्ण, ता.नांदगाव परिसरात असल्याची खात्रीलायक बातमी पोलिस पथकाला समजली. त्यानंतर अधिकच्या तपासात दोघे आरोपी मनमाड रेल्वे स्टेशनकडे मोटार सायकलने जात असल्याची माहिती समजली. पोलिस पथकाने दोघांच्या मोटार सायकलचा पाठलाग केला असता दोघांनी त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल जागीच सोडून रस्त्यालगतच्या शेतात पलायन केले.

पोलिस पथकाने त्यांचा सुमारे पाच किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केला. दोघांची सखोल चौकशी केली असता त्यांनी चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथील रहिवासी व सध्या डोंबिवली येथे राहणारा त्यांचा मित्र जनार्दन बाळु आवारे उर्फ राजु पाटील व सोनु भाऊ या दोघांच्या सांगण्यावरुन गणेश राठोड यांचे अपहरण केल्याची कबुली दिली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !