शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई : जमिनीत लपवलेला 70 लाखांचा गांजा जप्त


Shirpur police’s major action: Ganja worth Rs 70 lakhs hidden in the ground seized शिरपूर (3 मे 2025) : शिरपूर तालुका पोलिसांनी रोहिणी गावाजवळील जंगलात लपवून ठेवलेला सुमारे 70 लाख 70 हजारांचा गांजा पोलिसांनी जप्त करीत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी 10 फुट खोल खड्डा करून धान्य साठवण्याच्या कोठीत हा गांजा लपवला होता. भाईदास जगतसिंग पावरा (31, लकड्या हनुमान), बाटा अमरसिंग पावरा (59, रोहिणी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुक्यातील लकड्या हनुमान गावापासून पुढे गेल्यावर रोहिणी गाव आहे. या गावाला लागून सातपुडा पर्वतरांग तर काही अंतरावर मध्य प्रदेशची सीमा आहे. गावाच्या जंगलात गांजा साठवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने या ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी पसार होण्याच्या प्रयत्नातील दोघांना अटक करण्यात आली.

जमिनीत लपवला गांजा
आरोपींना पावसाळ्यात चढ्या किंमतीने गांजा विक्री करावयाचा असल्याने त्यांनी जमिनीत खोल खड्डे केले होते. पोलिसांनी जेसीबी आणून या ठिकाणी खोदले. त्यावेळी हा गोजा आढळला. कारवाईत एक हजार 10 किलो वाळलेला गांजा जप्त झाला. प्रत्येकी 7 हजार रुपये किलो प्रमाणे त्याची किंमत पोलिसांनी 70 लाख 70 हजार रुपये आहे. दोघा आरोपींविरोधात शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सुनील वसावे, मिलिंद पवार, हवालदार संतोष पाटील, हवालदार सागर ठाकुर, हवालदार संदीप ठाकरे, हवालदार रमेश माळी, हवालदार अल्ताफबेग मिर्झा, कॉन्स्टेबल धनराज गोपाळ, कॉन्स्टेबल योगेश मोरे, कॉन्स्टेबल सुनील मोरे, कॉन्स्टेबल संजय भोई, कॉन्स्टेबल ग्यानसिंग पावरा, कॉन्स्टेबल प्रकाश भील, कॉन्स्टेबल दिनकर पवार, कॉन्स्टेबल वाला पुरोहित, कॉन्स्टेबल रणजीत वळवी, कॉन्स्टेबल मनोज नेरकर, चालक सागर कासार आदींच्या पथकाने केली.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !