बीडमधील कुख्यात खिडकी गँग धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात
आरोपीविरोधात दोन डझनाहून अधिक गुन्हे : धुळ्यातील दोन गुन्ह्यांची उकल

Notorious window gang from Beed caught by Dhule Crime Branch धुळे (3 मे 2025) : धुळे गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यात कुख्यात खिडकी गँगच्या मुसक्या आवळल्या असून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला आहे. गँगमधील पाच सदस्यांना अटक करण्यात आली असून त्यांनी धुळ्यात दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. अटकेतील सर्वच आरोपी सराईत असून त्यांच्याविरोधात महाराष्ट्रभरात गुन्हे दाखल आहेत.
दोन गुन्ह्यांची उकल
अटकेतील आरोपींनी देवपुर भागातील लक्ष्मी नगर येथील एका घरात नोव्हेंबर 2024 मध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली तसेच महिंदळे शिवारातील राजेंद्र नगरात रघुनाथ राजाराम सोनार यांच्याकडे देखील 12 लाख 78 हजार 805 रुपयांचा ऐवज चोरल्याची कबुली दिली आहे.
या आरोपींना अटक
शेख अशफाक शेख आसीफ (45, मोहम्मदीया कॉलनी, आझाद नगर, ता.जि.बीड), आगामीर खान जहाँगिर खान (58, मोहम्मदिया कॉलनी, तेलगाव नाका, चुन्नूभाई यांच्याघरात ता.जि.बीड), फिरोज रहेमा शेख (36, पाण्याच्या टाकीमागे, मु.पो.घोडेगाव, ता.नेवासा), एफाझ शेख अनिस शेख (36, दत्ता चोरमले हॉटेलजवळ, भाग पिंपळगाव, ता.गेवराई, जि.बीड), शेख कलीम शेख अलीम (33, दहिफळ, ता.जि.बीड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
हा ऐवज केला जप्त
पाच मोबाईल, दोन हजारांची रोकड, चार लाखांची गुन्ह्यात वापरलेली आय ट्वेंटी (एम.एच.12 एच.झेड.1064), तीनशे रुपये किंमतीचे स्क्रू ड्रायव्हर असा एकूण चार लाख 33 हजार 300 रुपयांचे साहित्य तसेच 10 लाख 12 हजार 526 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व एक लाख 20 हजार 540 रुपये किंमतीचे देवपूर घरफोडीतील दागिने जप्त करण्यात आले..
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सुर्यवंशी, संजय पाटील, मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील, हवालदार योगेश चव्हाण, हवालदार हेमंत बोरसे, हवालदार प्रल्हाद वाघ, कॉन्स्टेबल अमोल जाधव आदींच्या पथकाने केली.
