जळगाव हादरले : अनैतिक संंबंधातून तरुणाची हत्या


Jalgaon shaken : Youth murdered over immoral relationship जळगाव (4 मे 2025) : शहरातील वाढती गुन्हेगारी चिंतेची बाब ठरत असताना कालिका माता मंदिर परिसरातील श्री प्लाझा परिसरात शनिवारी रात्री तरुणाची हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधाच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आकाश पंडित भावसार (सोनार, 27, रा.अशोक नगर, जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

धारदार शस्त्रांनी हत्या
शनिवार, 3 मे रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास आकाशची पत्नी पूजा भावसार हिच्याकडे संशयीतांनी आकाश कुठे आहे याबाबत विचारणा केली व आकाशचे लोकेशन मिळाल्यानंतर संशयीत श्री प्लाझाच्या दिशेने निघून गेले.

त्यानंतर 11 वाजेच्या सुमारास संशयित आरोपींनी श्री प्लाझा परिसरात आकाश भावसार याला घेरून धारदार हत्यारांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारेकर्‍यांनी धारदार हत्यारांनी गंभीर जखमी केले आणि पळून गेले. यानंतर कुणाल सोनार यांच्या मदतीने आकाश भावसार याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे वैद्यकीय पथकाने तपासून मयत घोषित केले.

पाच संशयीतांविरोधात गुन्हा
आकाश भावसार याची आई कोकिळाबाई पंडित भावसार (54) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस स्टेशनला पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मृताच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या वादातून हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तपास निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय साजीद मंन्सुरी हे करीत आहेत.

दरम्यान, आकाशला चार दिवसांपूर्वी मारेकर्‍यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, अशीही माहिती रुग्णालयात आकाशच्या बहिणीने दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !