बी.के.कुशवाहा परिवाराने लावले अस्थी व रक्षा विसर्जनातून स्मृतीचे वृक्ष

पर्यावरण जागर व टिम हिरवांकुरचे नाना पाटील यांनी केले मार्गदर्शन


Nana Patil of Pyaaryaan Jagar and Team Hirvankur guided भुसावळ (4 मे 2025) : शिरपूर कन्हाळा रोड के मार्ट समोरील रहिवासी स्व.श्रीराम कुशवाहा यांचे नुकतेच निधन झाले. यावेळी त्याचा मुलगा इंजिनिअर गोपाल भाई कुशवाह व त्यांच्या परिवाराने वडीलाचे अंतिम संस्कार पर्यावरण पुरक गोमातेच्या शेणापासून बनविलेल्या गोवर्‍यानी केला त्यांनतर अस्थी व रक्षा नदीत न टाकता जमिनीत गाडून त्यावर वड पिंपळ चिंच निंब असे पाच झाडे अमरधाम परिसरात लावली.

अस्थी व रक्षा जमिनीत गाडल्याने जलप्रदुषण वाचले. या जागेवर वृक्ष लावल्याने वृक्षाचे संगोपण संवर्धन केले जाईल त्यामुळे त्यांच्या स्मृति वृक्षाच्या निमित्ताने कायम राहतील . व जमिनीतही कमी होत असलेला कॅल्शियम जमिनीला मिळून वृक्षाना अधिक परिपक्व करेल . यासाठी आम्ही हा उपक्रम केला . यासाठी आम्हाला पर्यावरण जागर, टिम हिरवांकुर , पर्यावरण प्रेमी नाना पाटील सर यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले


प्रजापिता ब्रहमाकुमारी भुसावळ सेवाकेंद्राच्या ब्र कु कविता बहन यांनी कुशवाह परिवारातर्फे अस्थि व रक्षा विसर्जनातून स्मृति चे वृक्ष उपक्रम उपयुक्त असून हा उपक्रम समाजानेही करावा जेणेकरून वृक्ष सर्वधन होतील.

नाना पाटील सर यांनी गोपाल भाई कुशवाह व त्यांचा परिवाराचे हा उपक्रम राबवून समाजात आदर्श घालवून दिला, असे सांगितले. कुशवाह परिवाराचे आभारही मानले. यावेळी बी.के.सुनीता बहन, अनुपमा बहन, भरत भाई, बी.के.कविता बहन, नाना पाटील सर उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !