यावल शहरात हॉटेलमध्ये काउंटरवर धक्का लागल्याच्या कारणावरून एकाला दोघांची मारहाण
Two people beaten up for pushing a counter at a hotel in Yaval city यावल (4 मे 2025) : शहरातील फैजपूर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये काउंटरवर पैसे देत असताना धक्का लागल्याच्या वादातून वाद झाला आणि या वादातून एका 38 वर्षीय तरुणाला दोघांनी मारहाण केली. या हाणामारीत तरुणांच्या खिशातील सात हजार रुपये देखील गहाळ झाले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले यावलमध्ये
यावल शहरात फैजपुर रस्त्यावर हॉटेल भाग्यश्री आहे. या हॉटेलमध्ये काउंटरवर बिल देत असतांना धक्का लागला आणि या कारणावरून वाद झाला. या वादातून ईश्वर सोमनाथ कोळी (38, रा.बोरावल बुद्रुक) या तरुणाला आकाश बिर्हाडे व युगल चौधरी (दोन्ही राहणार यावल) यांनी शिविगाळ करून मारहाण केली. त्याला ओढून बाहेर आणत त्याला मारहाण करत असतांना त्याच्या खिशातील 7 हजार रुपये देखील कुठेतरी पडले आणि गहाळ झाले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश चौधरी करीत आहे.





