भुसावळात एम.डी.ड्रग्ज जप्त : काय आहे नेमके प्रकरण
MD drugs seized in Bhusawal : What is the exact case? जळगाव (4 मे 2025) : भुसावळातून अटक केलेल्या आरोपीच्या घरातून 23 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आल्याने शहरातील ड्रग्ज तस्कर हादरले आहेत. जळगाव शहराचे डीवायएसपी संदीप गावीत व त्यांच्या टीमने ही कारवाई केली. या प्रकरणात तीन जणांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
जळगाव शहरातील शाहूनगरात शहर पोलीस स्टेशनने टाकलेल्या धाडीत ड्रग्स जप्त करण्यात आले होते. यामधील मुख्य आरोपी सरफराज याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत याकुब याचे नाव समोर आले. त्यावर पाळत ठेवण्यात आल्यानंतर जळगाव येथे आल्यावर त्याला अटक करून चौकशी केली असता भुसावळ येथील अन्सार भिती, वसीम खान यांची नावे समोर आली.
वसीम खान यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून 23 ग्रॅम एमडी ड्रग्स मिळून आले. ही कारवाई 2 मे च्या रात्री सुरू झाली असता तीन मे च्या सकाळी तीन वाजता संपली. या कारवाईमध्ये डीवायएसपी संदीप गावीत, शहर पोलीस स्टेशनचे एपीआय नाईक, रीडर गायकवाड व इतर कर्मचार्यांसह फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी उपस्थित होती.
तिन्ही आरोपींना दुपारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली. यावरून पुन्हा जळगाव व भुसावळ शहरात एमडी ड्रग्स मोठ्या प्रमाणात आपले पाय फोफावत असल्याचे दिसून आलेले आहेत.
भुसावळ शहरामध्ये बाजारपेठ हद्दीमध्ये झालेल्या कारवाईतून बाजारपेठेमध्ये एमडी ड्रग्स यापूर्वीही पकडण्यात आलेले आहेत.