वृद्ध महिला वकिलाला लावला 75 लाखांचा चुना : जळगावातील प्रकार


Elderly woman lawyer cheated of Rs 75 lakhs : Jalgaon incident जळगाव (4 मे 2025) : संगनमताने कट रचून भूमिरत्नम रियल इस्टेट प्रा. लि. नावाची शेल कंपनी तयार करून 65 वर्षीय वृद्ध महिला वकिलाची 75 लाखांत फसवणूक केल्याचा प्रकार जळगावात घडला आहे. या प्रकरणी मनीष सतीश जैनसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तिघांना अटक करीत न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अ‍ॅड.शिरीन गुलाम अली अमरेलीवाला (65, रा.शांतीबन अपार्टमेंट, गजानन कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, मनीष सतीश जैन (49, रा. यश प्लाझा), अतुल सतीश जैन (50), यशोमती सतीश जैन, जाफर खान मजिद खान (रा. सुप्रीम कॉलनी), विजय इंद्रचंद ललवाणी (रा. सिंधी कॉलनी), अक्षय अग्रवाल (रा.गोलाणी) व केतन किशोर काबरा (रा. ओंकारेश्वर मंदिराजवळ, जयनगर) यांच्या विरुद्ध शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सात जणांनी संगनमत करून बनावट शेल कंपनीत 75 लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले.

त्या बदल्यात व्याज देण्याचे व मुंबईत फ्लॅट देण्याचे सांगितले होते. सुरुवातीला नफ्याची रक्कम दिली. मात्र, त्यानंतर पैसे दिले नाहीत. या तक्रारीचा आर्थिक गुन्हा शाखेतर्फे तपास केल्यानंतर अमरेलीवाला यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात 1 मे रोजी रात्री आठ वाजता मनीष सतीश जैन, अतुल सतीश जैन व विजय इंद्रचंद ललवाणी या तिघांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना कोटनि सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !