बारावी परीक्षा : राज्याचा निकाल 91.88 टक्के : मुलीच टॉपर मात्र यंदा टक्का घसरला

पुणे (5 मे 2025) : बारावी परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे. या वर्षी 1.49 टक्के निकाल कमी लागला आहे.
फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के लागला होता. फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के लागला आहे. निकालाचा टक्का 1.49 ने यंदा कमी झाला आहे. या वर्षी कॉपी विरोधात कडक मोहिम राबवली होती. यामुळे निकाल कमी लागल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण 154 विषयांपैकी 37 विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

राज्यात 11 फेब्रुवारी ते मंगळवार, 18 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण 15 लाख पाच हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आठ लाख दहा हजार 348 मुले, सहा लाख 94 हजार 652 मुली, 37 ट्रान्सजेंडर. एकूण 10550 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती, तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी 3373 मुख्य केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली, अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली.
विभागनिहाय निकाल
पुणे- 91.32 टक्के
कोकण- 96.74 टक्के
नागपूर- 91.32 टक्के
छत्रपती संभाजीनगर-92.24 टक्के
मुंबई- 92.93 टक्के
कोल्हापूर- 93.64 टक्के
अमरावती- 91.43 टक्के
नाशिक – 91.31 टक्के
लातूर – 89.46 टक्के
बारावीचा निकाल या लिंकवर पाहता येईल
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
http://hscresult.mkcl.org
https://mahahsscboard.in
