राहुल गांधी हिंदू द्वेषी : भुसावळातील शिशिर जावळे यांचा आरोप

Rahul Gandhi is a Hindu hater: Allegation by Shishir Javale from Bhusawal भुसावळ (6 मे 2025) : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील ब्राउंड विद्यापीठांमध्ये भाषण करताना प्रभू श्रीराम हे पौराणिक पात्र आहेत असे संबोधित केले त्यामुळे भारतामध्ये त्यांचे विरुद्ध वातावरण चांगले तापले आहे. गांधी यांच्या वक्तव्याचा भुसावळातील शिशिर जावळे यांनी निषेध केला आहे.
ब्राऊन विद्यापीठातील वॉटसन इंटरनॅशनल अॅण्ड पब्लिक अफेअर्स येथे राहुल गांधी यांच व्याख्यान झाले. यावेळी धर्मनिरपेक्ष राजकारणाची संकल्पना हिंदू राष्ट्रवादाच्या पृष्ठभूमीवर कशी मांडावी या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना प्रभू श्रीराम हे पौराणिक पात्र असल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या व्याख्यानात म्हणाले.
आपल्या सर्व पुराणकथातील पात्र जसे की प्रभू राम क्षमाशील , करुणा णाशील होते हे भाजप जय हिंदुत्व मांडते ते ते खरे हिंदुत्व नाही. हिंदू विचार अधिक सर्वसमावेशक, असा सहिष्णू, प्रेमळ व मुक्त आहे हे महात्मा गांधी हे त्यांचे सर्वोत्तम उदाहरणे असे राहुल गांधींनी यावेळी म्हटले. राहुल गांधी हे सातत्याने हिंदू धर्माविषयी हिंदू धर्मातील आराध्य श्रद्धास्थान असलेले देवी देवता पवित्र ठिकाण महात्म्यांविषयी विविध महापुरुषांविषयी सातत्याने टीकाटिपणी करत असतात त्यांचा द्वेष करीत असतात आणि ते सातत्याने राजकीय स्वार्थापोटी स्वतःच् राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सनातन हिंदू धर्माला नेहमी विविध ठिकाणी टार्गेट करीत असतात आणि वारंवार याबाबत त्यांच्या अशा बेताल वक्तव्यांमुळे वाद उद्भवतात ते धार्मिक भावना दुखावण्याचा काम करतात त्यामुळे ते कायम हिंदू धर्माचा द्वेष करतात हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ते हिंदू द्वेषी आहेत. त्यांचे असे बेताल हिंदु द्वेषी वक्तव्य हे भारताची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असतात.
एकीकडे पहलगाममध्ये अधिकार्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक हिंदू भारतीय पर्यटकांना आपला प्राण गमावावा लागला. एकीकडे देशांमध्ये सध्या दुःखाची लाट पसरलेली असून मात्र राहुल गांधींना त्याच्याविषयी काही घेणं देणं नाही. ते पाकिस्तानच्या विविध भारत विरोधी कारवायांबाबत एक शब्द बोलत नाही. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाला पौराणिक पात्र म्हणणारे राहुल गांधी ची ही वृत्ती रावणासारखीच आहे. हिंदूंचे आराध्य असणारे प्रभू श्रीरामांबद्दल बोलण्याची त्यांची लायकी नाही शिवाय तितके त्यांच्यावर नैतिक नीतिमूल्यांचे संस्कार झालेले नसल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकांद्वारे प्रसिद्धीस दिले आहे. गांधी विरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.
