महाराष्ट्रात राजकीय भूकंप ! दोन्ही पवार एकत्र येणार ?

Political earthquake in Maharashtra ! Will both Pawans come together ? पुणे (8 मे 2025) : टोकाच्या राजकीय मतभेदातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांसह आमदार बाहेर पडले होते मात्र आगामी चार महिन्यात होणार्या निवडणुकांसाठी राजकीय आखाडे तापले असतानाच दोन्ही पवार आता एकत्र येत असल्याच्या चर्चा समोर आल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? याबाबत आता दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
पवारांनी प्रथमच केले भाष्य
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या प्रश्नाला उत्तर देताना हा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यावा. मी या प्रक्रियेत नाही. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्रीत यावे, असे मत मांडले आहे. पवारांनी पहिल्यांदाच उघडपणे या विषयावर भाष्य केले आहे.
काय म्हणाले शरद पवार
एका इंग्रजी दैनिकाच्या मुलाखतीत शरद पवारांनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यावर सविस्तर उत्तर दिले. दोन्ही बाजूचे प्रतिनिधी एकाच विचारांचे आहेत. सध्या आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहे. त्यात काही जण अजित पवारांसोबत एकत्र येण्याचे मत मांडतायेत तर काही जण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाजपासोबत न जाण्याची भूमिका मांडत इंडिया आघाडीसोबत कायम राहण्याचं मत मांडत आहेत परंतु इंडिया आघाडी सध्या सक्रीय नाही त्यामुळे आम्हाला संघटनेसोबत पक्ष पुन्हा उभा करावा लागणार आहे. युवकांना सोबत घेऊन काम करावं लागणार आहे.
आमचा विचार विरोधात राहायचा आहे. भाजपाला पर्याय म्हणून आम्हाला उभे राहायचे आहे असं सांगत शरद पवारांनी अजित पवारांसोबत भेटीवरही खुलासा केला. राजकारणासाठी आमची भेट होत नाही. अनेक संस्था, कारखाने आहेत तिथे आम्ही एकत्रितपणे काम करतो. मग एनडीए असेल, डावे असतील, कामासाठी या भेटी होतात. सत्तेसोबत जायचे की नाही, संसदेत विरोधात बसायचे की नाही याचा निर्णय सुप्रिया सुळेंना घ्यायचा आहे असंही शरद पवारांनी स्पष्ट केले.
भूजबळ म्हणाले तर आनंदच होईल
काही दुरावलेली सगळी कुटुंब एकत्र आली तर आम्हाला मनापासून आनंद होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून शरद पवारांनी आज आशेचा किरण दाखवला आहे ही आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला सगळ्यांना मिळेल. राष्ट्रवादीची शक्तीही वाढणार आहे अशी भावना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
