वादळी संकट : यावल तालुक्यात 500 हेक्टरवर पिकांचे नुकसान


Storm disaster: Crops damaged on 500 hectares in Yaval taluka यावल (8 मे 2025) : यावल तालुक्यात मंगळवारी झालेल्या वादळी पावसात पश्चिम भागात प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वार्‍यासह दाखल झालेल्या पाऊसामुळे शेतकरी बांधवांच्या केळी पीक जमीनदोस्त झाले आहे. यात तालुक्यातील 28 गावातील एक हजार 540 शेतकर्‍यांच्या 465.45 हेक्टरावरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आंदाज आहे. या संपुर्ण नुकसान ग्रस्त भागातील पाहणी चोपडा आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे सह अप्पर जिल्हाधिकारी, प्रांत व तहसीलदारांनी केली आहे व पंचानाम्यास सुरवात झाली आहे.

यावल तालुक्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वार्‍यासह पाऊसामुळे तालुक्यातील पश्चिम भागात किनगाव, डांभुर्णी, चिंचोली, उंटावद, आडगाव, कासारखेडा, दहीगाव, मनवेल, साकळी आदी गावासह परिसरात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी डांभुणी सह परिसरात चोपडा आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, फैजपुर विभागाचे प्रांतधिकारी बबनराव काकडे, तहसिलदार मोहनमाला नाझीरकर, बाजार समितीचे संचालक सुर्यभान पाटील यांच्या प्रमुख उपस्थित नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली.



डांभूर्णी परिसरात मोठ्या प्रमाणात केळी बागा या जमीनदोस्त होत शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. तर आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी प्रशासनास तातळीने पंचनामे करण्याच्या सुचना करण्यात आल्या असुन पंचनाम्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर प्रथम दर्शनी पाहणीत तालुक्यातील 28 गावातील 1 हजार 540 शेतकर्‍यांच्या 465.45 हेक्टरवरिल पिकाचे नुकसान झाल्याचे दिसुन आहे आहे. पाहणी प्रसंगी डांभूर्णी गावाच्या लोकनियुक्त सरपंच कल्पनाबाई बाविस्कर, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !