पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा शेततळ्यात मृत्यू : पाचोरा तालुक्यातील घटना


Two die in farm pond due to water shortage : Incident in Pachora taluka न्युज डेस्क । पाचोरा (9 मे 2025) : अंतुर्ली शेत-शिवारात शेततळ्यात तरुणांसह बालक मजुरांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, 8 मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

रवी परभत कोळी (14, रा.पुनगाव, ता.पाचोरा) असे बालकाचे तर पद्मसिंग भगवान पाटील (21, रा.अंतुर्ली बुद्रुक, ता.पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे.


पदमसिंग पाटील यांच्या पश्चात वृद्ध आई, विवाहित बहिण तर रवींद्र कोळी यांच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ असा परिवार आहे.

गुरुवारी संध्याकाळी पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक शिवारातील शेततळ्यात तरुणासह बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ग्रामस्थांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तपास पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके करीत आहेत.

 











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !