धुळ्यात अडीच लाखांच्या गांजासह दोघे जाळ्यात : शहर पोलिसांची कारवाई

Two arrested with ganja worth Rs 2.5 lakh in Dhule : City police take action धुळे (9 मे 2025) : धुळे शहर पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे दोघांकडून अडीच लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. गणेश सुरेशसिंग परदेशी (रा.बुंदेलपुरा, नांदगाव रोड, येवला, जि.नासिक) व सुनील पावरा (रा.पिरपाणी, ता.शिरपूर जि. धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे शहर पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना गांजाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. सुरत बायपास रोडवर सापळा रचल्यानंतर 8 मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गणेश परदेशी येताच त्यास ताब्यात घेण्यात आले व त्याच्याकडील सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचा दहा किलो गांजा जप्त करण्यात आला. गणेश परदेशीने हा गांजा
सुनील पावरा याच्याकडून आणल्याची माहिती दिल्यानंतर त्यासही अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस अंमलदार कुंदन पटाईत, राहुल सोनवणे, गौरव देवरे, महेश मोरे, राकेश मोरे, धम्मपाल वाघ, तुषार पारधी, प्रशांत नाथजोगी, योगेश ठाकुर, अमित रणमाळे, अमोल पगारे यांच्या पथकाने केली. तपास एपीआय वर्षा पाटील करीत आहेत.
