जामनेर तालुक्यात लग्न वर्हाडाच्या वाहनाला कंटेनरची धडक : नवरदेवाचा काका ठार तर नऊ गंभीर

A container hits a wedding procession vehicle in Jamner taluka : The groom’s uncle is killed and nine others are in critical condition. जामनेर (11 मे 2025) : लग्न वर्हाडाच्या क्रुझर वाहनाला समोरून येणार्या कंटेनरने धडक दिल्याने नवरदेवाचा काका जागीच ठार झाला तर अन्य नऊ वर्हाडी गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवार, 10 मे रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास पहूर-जामनेर मार्गावरील सोनाळा फाट्याजवळ घडला. दशरथ रतन चव्हाण (55, रा.फर्दापूर, ता.सोयगाव) असे मयताचे नाव आहे.
कसा घडला अपघात ?
फर्दापूर तांडा येथील चव्हाण परिवार जामनेर तालुक्यातील टाकळी येथे लग्नासाठी कु्रझर वाहनाने शनिवारी आला होता. लग्न आटोपल्यानंतर लग्नातील वर्हाड मंडळी क्रुझर वाहनाने फर्दापूर गावाकडे जाण्यासाठी जामनेर रोडने निघाल्यानंतर मार्गावर कु्रझर (एम.एच.08 आर.3524) ला समोरून येणारा कंटेनर (जी.जे.15 एक्स.1425) ने धडक दिल्याने क्रुझर वाहन तीन वेळा पलटी झाले. या अपघातात दशरथ चव्हाण हे जागीच ठार झाले.
नऊ वर्हाडी जखमी
अपघातात माजी सरपंच हिरा चव्हाण, काळू बापू चव्हाण, वस्त्राम नुरा जाधव, उखा दलू राठोड, धीरलाल खंडू राठोड, लखीचंद शंकर चव्हाण, मोहनदास शंकर जाधव, विक्रम मोतीलाल चव्हाण, बाळू जाधव, भिवसेन मनुर चव्हाण आणि सात वर्षीय कार्तिक राठोड जखमी झाला.
जखमींना शासकीय रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
बोदवड येथील रुग्णवाहिकेचे चालक मनोज तेली, डॉ.मुख्तार पटेल, शेदुर्णी येथील चालका सुनिल लोखंडे आणि डॉ. अनिकेत सोनवणे यांनी जखमींना उचलून उपचारासाठी रुग्णालयात आणण्यासाठी सहकार्य केले.
