भुसावळातील के.नारखेडे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे मूल्य शिक्षण स्पर्धेत यश

Students of K. Narkhede Vidyalaya in Bhusawal achieve success in the Value Education Competition भुसावळ (11 मे 2025) : फेब्रुवारी 2025 मध्ये इस्कॉन संस्थेतर्फे व भुसावळातील डॉ.रेखा पाटील व इस्कॉनचे समन्वयक पांडुरंग शरणदास यांच्या सहकार्याने भगवद गीतेवर आधारित मूल्य शिक्षण स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत के. नारखेडे विद्यालयातील शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यापैकी दुपार शाखेतील धीरज संजय साळुंखे या विद्यार्थ्याने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने त्यास सायकल बक्षीस देण्यात आली तसेच जयेश दीपक पाटील या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर सकाळ शाखेची विद्यार्थिनी नीलाक्षी संदीप चौधरी हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या संपूर्ण परीक्षेचे आयोजन शिक्षक एस.पी.पाठक यांनी केले होते. या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करताना विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, एन.बी.किरंगे, एस.पी.पाठक, बी.बी.जोगी, बक्षीस पात्र विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मकरंद नारखेडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
