भुसावळातील विद्युत लोको शेडमध्ये महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

Maharana Pratap Jayanti celebrated with enthusiasm at the Electric Loco Shed in Bhusawal भुसावळ (11 मे 2025) : शहरातील विद्युत लोको शेडमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सहाय्यक विद्युत अभियंता ध्रुवकुमार देवांगण यांनी महाराणा प्रताप यांची जीवन गाथा गायली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सहाय्यक विद्युत अभियंता सिराज अहमद, रणजीत चौधरी, अजय महाजन, अमित भोळे, मनोज सिंगेल, नयन सिंग, ललित चौधरी, सुधीर राजपूत, सुधांशु राजपूत, लक्ष्मण सिंग, विष्णू सिंग, दीपक राजपूत, दीपक पाटील, आयुष ठाकूर, बाळू चौधरी, यश राजपूत, राहुल राजपूत, बिंकू सिंग, मोहन राजपूत, आशिष सिसोदिया, रविराज सिंग, राजीवकुमार सिंग, लाखन सिंग, दीपक बोराडे, संतोष सिंग, नितीन परदेसी, रेल कामगार सेना चे मंडल अध्यक्ष ललित कुमार मुथा, विजय पाटील, एनआरएमयुचे ललित भारंबे, भूषण इंगळे, निलेश इंगळे, इ एम बी सोसायटीचे अध्यक्ष सुशील पगारे, सीसआरएमएसचे जयेश ढाकणे, संजय भारंबे, जुनेद कुरेशी, एससीएसटी असोशिएशनचे समाधान हिवाळे, चेतन तायडे, ओबीसी युनियनचे महेश राणे, एबीसिई युनियन चे नागसेन यशोदे,राजू वानखेडे, भुपेंद्र घोलप तथा संपूर्ण शेड परिवार उपस्थित होता. सूत्रसंचालन चेतन तायडे तर आभार रणजीत चौधरी यांनी मानले.
