जळगावात कोयत्याद्वारे दहशत : दोघांना एमआयडीसी पोलिसांकडून अटक


Terror by Koyata in Jalgaon: Two arrested by MIDC police जळगाव (11 मे 2025) : जळगावात कोयदा बाळगून दहशत निर्माण करणार्‍या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. शनिवारी सायंकाळी सात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांना पोलिसांकडून अटक
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, अजिंठा चौफुली येथे दोन व्यक्ती कोयता घेऊन फिरत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पाटील यांनी तातडीने पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.

एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने शनिवारी दुपारी चार वाजता अजिंठा चौफुली भागातून संशयित आरोपी उमेश भगवान जाधव (33) आणि गणेश भगवान लोहार (27, दोघेही राहणार अयोध्या नगर, जळगाव) यांना लोखंडी कोयत्यासह ताब्यात घेतले.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शादाब सय्यद यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून उमेश जाधव आणि गणेश लोहार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !