पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या जावयाने मेहुणीलाच पळवले !


Son-in-law who came to meet his wife kidnapped his sister-in-law! जळगाव (11 मे 2025) : माहेरी आलेल्या पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या पतीने आपल्या मेहुणीलाच पळवल्याचा प्रकार जामनेर तालुक्याती घडला. जावयाने केलेल्या या कृत्यामुळे सासुरवाडीतील मंडळी हैराण झाली आहे. सासरच्या मंडळींनी थेट पोलीस ठाणे गाठून जावयाची तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
तक्रारदार महिलेची मोठी मुलगी गर्भवती असल्यामुळे तिला भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वी जावयी सासरी आला. जावयाने अल्पवयीन मेहुणीची तब्येत खराब असल्याने तिला मीच दवाखान्यात घेवून जातो म्हणून सांगितल्यानंतर घरच्यांनीही होकार दिला मात्र जावयाने मेहुणीला दवाखान्यात न नेता थेट पळवून नेले.

सायंकाळ होवूनही मुलगी व जावई न आल्यानंतर सासुरवाडीतील मंडळी बेचैन झाली व त्यांनी आसपासच्या गावांमध्ये शोध घेतला मात्र दोघांचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर जावयाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जावयाच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून दोघांना ताब्यात घेतल्यानंतरच खर्‍या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !