दहावीच्या निकालात यंदाही कोकनच टॉपर : सावित्रीच्या लेकींनी मारली बाजी


Kokan is the topper in the 10th class results this year too: Savitri’s girls won the race मुंबई (13 मे 2025) :दहावी परीक्षेचा निकाल बोर्डाच्या संकेत स्थळावर मंगळवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला.

यंदा राज्यात दहावी परीक्षा निकाल 94.10 टक्के लागला आहे. फेब्रुवारी-मार्च 2024 चा निकाल टक्के होता.

फेब्रुवारी-मार्च 2024 च्या तुलनेत फेब्रुवारी-मार्च 2025 चा निकाल 1.71 टक्क्यांनी कमी लागला आहे. परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मंडळाचे सचिव देविदास कुलाळ ,सहसचिव मेधा निरफारके, सहाय्यक सचिव सीमा रांगडे,लेखाधिकारी शैलेंद्र पाटील, गणतंत्र व्यवस्थापक हेमंत राजपूत उपस्थित होते.

गोसावी म्हणाले की, या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,46,579 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 94.10 आहे.

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 28,512 खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 28,020 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 22,518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 80.36 आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 24,376 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23,954 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 9,448 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 39.44 आहे.

8,844 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, खासगी व पुनर्परिक्षार्थी मिळून एकूण 16,10,908 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,98,553 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,87,399 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 93.04 आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 9,673 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9,585 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 8,844 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 92.27 आहे.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !