भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के


10th class result of Biyani Military School in Bhusawal is 100 percent भुसावळ (14 मे 2025) : शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. युवराजसेन रुद्रसेन गंठिया या विद्यार्थ्याने 94.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर यश प्रशांत कोल्हे या विद्यार्थ्याने 93.40 टक्के गुण मिळवून द्वितीय तसेच त्रिशा विजय पाटील या विद्यार्थ्यानीने 93.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

विद्यालयाने राखली यशाची परंपरा
या निकालाचे खास वैशिष्ट्य म्हणजे शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांवर गुण मिळवले. यात मोनिका मुकेश गोले (92.60), पूर्वा गणेश बडे (92.20), माही लवकुश भायरे (92.20), प्रथमेश अविनाश खारोडे (91.80), भूमीत हेमराज नारखेडे (91.60), अर्चीत बाळू चौधरी (91.40), यशराज संजय वाघ (91.40), आयुष शरद राणे (91.00), केदार विजय सूर्यवंशी (91.00), वैष्णवी योगेश पाटील (91.00), दर्शन विजय पाटील (91.00), सुपेश अजबराव शिंगोटे (91.00), श्रेयश भिवसन गोपाळ (91.00), अथर्व श्रीराम निंबोळकर (91.00), मयूर मधुसूदन पाटील (91.00), अमित पचेरिया (91.00).


यशस्वी विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी, प्राचार्य डी.एम.पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा दिल्या आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !