नंदुरबार एसीबीची मोठी कारवाई : 25 हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह शिपाई जाळ्यात


गणेश वाघ
Nandurbar ACB takes major action : Police Sub-Inspector and constable caught while accepting bribe of Rs 25,000 भुसावळ (16 मे 2025) : मटक्याचा व्यवसाय सुरळीतपणे चालू देण्यासह कुठलीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 25 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जालना शहरातील ग्रेडेड पोलीस उपनिरीक्षकासह पोलिसाला नंदुरबार एसीबीने जालन्यातून अटक केली. या कारवाईने जालना पोलीस दलातील लाचखोर प्रचंड हादरले आहेत.

या संशयीतांना अटक
परशुराम महादू पवार (56) असे अटकेतील श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाचे तर लक्ष्मण नंदू शिंदे (30) असे पोलीस शिपायाचे नाव आहे.




असे आहे लाच प्रकरण
25 वर्षीय तक्रारदार हे तालुका जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीत मटक्याचा व्यवसाय चालवतात. तक्रारदार यांचा मटक्याचा व्यवसाय तालुका जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरळीतपणे चालू देण्यासाठी व तक्रारदार यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी फौजदार पवार यांनी 25 हजारांची लाच मागणी केली व शिंदे यांनी लाच मागणीला प्रोत्साहन दिल्याने नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली व लाच मागणी झाल्याचे पडताळणीत सिद्ध झाले.

ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने 25 हजार रुपये लाचेची रक्कम गुरुवारी फौजदार परशुराम पवार यांना दिल्यानंतर त्यांना व नंतर शिंदे यांना अटक करण्यात आली. पवार यांच्याकडील मोबाईल तसेच शिंदे यांच्याकडील आयफोन जप्त करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, हवालदार हेमंत महाले, हवालदार विजय ठाकरे, हवालदार देवराम गावीत, हवालदार नरेंद्र पाटील, हवालदार जितेंद्र महाले यांच्या पथकाने यशस्वी केला.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !