जळगावात धावत्या कारमध्ये गोळीबार : तरुण गंभीर


Shooting in a moving car in Jalgaon: Young Gambhir जळगाव (16 मे 2025) : गावठी कट्टा हाताळताना त्यातून गोळी सुटल्याने धावत्या कारमधील तरुण गंभीर जखमी झाला. नाजीम फिरोज पटेल (25, पाळधी, ता.धरणगाव) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली.

काय घडले जळगावात
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील नाजीम फिरोज पटेल (25, पाळधी) हा तरुण शेप असून पाळधी येथे आई-वडील दोन भाऊ यांच्यासह वास्तव्यास आहे. बुधवार, 14 मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास नाझीम पटेल हे आपले मामा बबलू पटेल व मित्र तोहित देशपांडे अल्ताफ शेख यांच्यासह चारचाकी (क्रमांक एम.एच.19 क्यू.7514) याने भुसावळ येथे एका कार्यक्रमासाठी आले होते.

कार्यक्रम आटोपल्यानंतर पाळधी येथे जात असताना पुन्हा जळगाव शहरातील दूध फेडरेशन रस्त्यावरून जात असताना बबलू पटेल हे चारचाकी चालवत होते तर तोहितने कुठूनतरी आणलेले पिस्तूल हाताळताना गोळी सुटली व ती नाझीम पटेल यांच्या पाठीत जावून मणक्यात अडकली.

घटना घडल्यानंतर लागलीच नाजीम पटेल यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी जळगाव शहर पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा संशयित आरोपी तोहित देशपांडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. तपास एपीआय राम शिखरे हे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !