जळगावात सशस्त्र टोळक्यांचा जळगावात धुमाकूळ : पाच घरांवर हल्ला


जळगाव (16 मे 2025) : शहरातील तुकारामवाडी परिसरातील सम्राट कॉलनीत चार ते पाच घरांवर तरुणांच्या टोळक्याकडून सशस्त्र हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली.

या तरुणांच्या टोळक्याकडून दगडफेकसह तलवारी व इतर शस्त्रांनी हल्ला करत घराबाहेर पार्क करण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकींची देखील तोडफोड करण्यात आली. या घटनेमध्ये मोठं नुकसान झालं आहे. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

जळगावच्या तुकारामवाडी परिसरात असलेल्या सम्राट कॉलनीमध्ये 20 ते 25 तरुण हातामध्ये तलवारी, कोयते आणि बंदुका घेऊन कॉलनीमध्ये शिरले त्यांनी दगडफेक केली तसेच आपल्या हातातील शस्त्रांनी कॉलनीमध्ये पार्क केलेल्या वाहनांंवर हल्ला केला, या घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे, अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ते 25 तरुणांचं टोळकं होतं. त्यांच्या हातात शस्त्रं होती. त्यांनी दगडफेक करत वाहनांवर हल्ला केला. कॉलनीमधील रहिवाशांनी दरवाजा न उघडल्यानं तसेच ते यादरम्यान घराबाहेर न पडल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेत नागरिक सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही.

एक तास या तरुणांच्या टोळक्यानं या परिसरात राडा केला. कॉलनीमध्ये पार्क करण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर हल्ला करण्यात आला या घटनेत वाहनांचंं मोठं नुकसान झालं आहे. तरुणांच्या दोन गटामध्ये असलेल्या पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर या परिसरामध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कॉलनीमध्ये घुसून राडा करणार्‍या तरुणांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !