मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या पुनखेडा-पातोंडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन


रावेर (16 मे 2025) : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री व संकटमोचक गिरीषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त पुनखेडा-पातोंडी रस्त्याच्या विकासकामांचे भूमिपूजन शनिवार, 17 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. हे भूमिपूजन महंत राजगिरी महाराज, भूतनाथ मंदिर, पुनखेडा यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

विशेष प्रयत्नातून काम मार्गी
या विकासकामासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. रावेर विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व लोकप्रिय आमदार अमोल जावळे यांच्या विशेष प्रयत्नांतून हे बहुप्रतीक्षित काम अखेर मार्गी लागले आहे.

दळण-वळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता अनेक गावांना जोडणारा असून, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रस्ता विकसित होणार असल्याने स्थानिक ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण असून, आमदार अमोलभाऊ जावळे यांचे सर्वसामान्य नागरिकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

या कार्यक्रमास सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रावेर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !