मंत्री गिरीश महाजनांच्या वाढदिवसाचे औचित्य : डॉ.कुंदन फेगडे यांच्याकडून राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी 21 हजारांची मदत


Minister Girish Mahajan’s birthday : Dr. Kundan Fegde donates Rs. 21,000 to the National Defense Fund यावल (17 मे 2025) : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा शनिवार, 17 रोजी वाढदिवस असलातरी पहलगाममध्ये झालेल्या निष्पाप पर्यटकांच्या हत्येमुळे हा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मंत्री महाजन यांनी वाढदिवसाला हार-तुरे, जाहिरात व बॅनरबाजीवर खर्च न करण्याचे आवाहन केल्याने यावलचे भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय आघाडीचे समर्थक पदाधिकारी डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांनी राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी 21 हजार रुपयाची मदत दिली.

देशासाठी पुढे येण्याचे आवाहन
देशभरातील सर्व नागरिकांनी यथाशक्तीची मदत भारताला करण्यासाठी डॉ.कुंदन फेगडे यांनी पुढाकार घेत जनतेलाही आपल्या घरातील प्रत्येक आनंदाच्या क्षणी खर्चात कपात करून देशाची सेवा करावी जेणेकरून सैनिकांना त्यांचे आरोग्य चांगले राखता येईल व आवश्यक त्या सुविधा पुरविण्याबाबत मदत होईल, असे डॉ.फेगडे यांनी कळवले आहे.





शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करता येईल अशा शुद्ध हेतूने राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी सर्वांनी आपापल्या इच्छेनुसार मदत करावी, आवाहन डॉ.कुंदन फेगडे यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !