यावलमधील अतिक्रमणावर फिरणार बुलडोझर : अतिक्रमण धारकांना तीन दिवसांची मुदत

Bulldozers will move on encroachments in Yaval : Encroachment holders given three days’ time यावल (17 मे 2025) : नगरपरिषदेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यालगतचे संपूर्ण अतिक्रमण काढण्या करीता विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. या दृष्टीने शहरातील सर्वचं अतिक्रमण धारकांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विविध व्यवसायीकांसह ज्यांच्या घराच्या पायर्या जर गटारीच्या पुढे असतील ते अतिक्रमण देखील काढण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे.
अतिक्रमणामुळे रहदारीची डोकेदुखी
शहरात अतिक्रमणामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमणामुळे नागरीकांना व वाहन धारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे यावल नगरपरिषदेने आता अतिक्रमण काढणे संदर्भात प्रत्यक्षात कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. शहरातील अतिक्रमण धारकांना नगर परिषदेने तीन दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत सोमवारी संपणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष अतिक्रमण काढण्यास सुरवात होणार आहे.

अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात पालिकेचे आवाहन
शहरात अनेकांनी आपली घरे, दुकाने बांधकाम करताना सोयीनुसार अतिक्रमण केले आहे. अनेकांनी तर भर रस्त्यात आपल्या दुकानातील वस्तूंचे, सामानाचे बेकायदा मांडले आहे. यामुळे दैनंदिन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. या अतिक्रमणामुळे शहरात दररोज वाहतुकीस सतत अडथळा निर्माण होत असल्याने अनेक वेळा भांडणे, तंटे, वाद व किरकोळ अपघात सुरू आहेत. परिणामी एखाद्या वेळेस मोठी अप्रिय घटना घडू नये म्हणून यावल शहरातील नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमण करणार्यांना यावल नगर परिषदेने एक अधिकृतरित्या जाहीर सूचना देऊन अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात कळविले आहे.
