कामायनी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब : निनावी फोननंतर प्रवाशांच्या उरात भरली धडकी
खंडव्यात गाडी तपासणी झाल्याने पठाणकोट, पवन एक्स्प्रेस धावली दिरंगाईने

Bomb in Kamayani Express: Passengers panic after anonymous phone call भुसावळ (18 मे 2025) : भोपाळकडून मुंबईकडे जाणार्या कामायनी एक्स्प्रेस गाडीत बॉम्ब ठेवला असल्याचा फोन भोपाळ जीआरपी पोलिसांना शनिवारी आल्यावर तत्काळ भुसावळ आरपीएफ कंट्रोलला माहिती दिल्यावर खंडव्यात या गाडीची तपासणी करण्यात आली. यामुळे गाडी 52 मिनिटे थांबवून ठेवण्यात आली. परिणामी मागाहून भुसावळकडे येणार्या पठाणकोट एक्स्प्रेस व पवन एक्स्प्रेस या गाड्या नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने धावत होत्या तर अन्य गाड्याही विलंबाने भुसावळात आल्यात.
काय घडले नेमके
शुक्रवारी भोपाळकडून भुसावळकडे येत असलेल्या कामायनी एक्स्प्रेस या गाडीत बॉम्ब ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर या गाडीची खंडवा स्थानकावर कसून तपासणी करण्यात आली होती. ही गाडी 52 मिनिटे तेथे थांबविण्यात आली होती. यामुळे पाठीमागून येणारी पठाणकोट एक्स्प्रेस 2.30 तास लेट झाली. यापाठोपाठ पवन एक्स्प्रेस 1.30 तास, हावडा मुंबई सुपरफास्ट 7.20, हावडा मेल 2.30, शालीमार पोरबंदर एक्स्प्रेस 4 तास, शालिमार एक्स्प्रेस 4 तास, तर कामायनी भुसावळात 1.15 मिनिटांनी आली.