अपघातात गहू चोरीचा बनाव : त्रिकूटाला शिरपूर पोलिसांकडून अटक

शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी : आरोपींना दोन दिवसांची कोठडी


Trio arrested by Shirpur police for fabricating wheat theft in accident शिरपूर (18 मे 2025) : सेंधवा येथून पुण्यातील सनसवाडी येथे सुमारे दहा लाखांचा गहू पाठवण्यात आल्यानंतर चालकाने वाहनाचा अपघात झाल्याचे भासवत गव्हाची लूट झाल्याची बतावणी केली होती मात्र व्यापार्‍याला चालकाचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांनी शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला होता व तपासात आरोपी चालकासह तिघांनी अपघाताचा बनाव करीत गव्हाची विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी त्रिकुटाला अटक करण्यात आली असून चोरी केलेला गहूदेखील जप्त करण्यात आला आहे.

असे आहे फसवणूक प्रकरण
29 एप्रिल 2025 रोजी सेंधवा येथील यश अनिल गोयल (31) यांनी त्यांच्या गुरुकृपा अँग्रोटेक कंपनीमार्फत 31 हजार 220 किलो वजनाचा घेतलेला गहु ट्रान्सपोर्टर पवन जगदीश कुमरावत यांच्या शिवकृपा रोडलाईन्स ट्रान्सपोर्टमार्फत सेंधवा येथून सनसवाडी, पुणे येथे पोहोवण्यासाठी दिला होता. पवन कुमरावत यांनी आकाश बाविस्कर यांच्या मालकिचा ट्रक (क्रमांक एम.एच.18 बी.जी.8833) मध्ये गहु भरुन वाहन चालक राहुल जामरे याला पाठविले होते.

अपघाताचा केला बनाव
2 मे 2025 रोजी पहाटे 6.30 वाजता महाराष्ट्रातील दहिवद गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 गहू नेणार्‍या वाहनाचा अपघात घडून गव्हाचे पोते चोरी झाल्याची बतावणी ट्रान्सपोर्टर, वाहन मालक, वाहन चालक यांनी करीत यश गोयल यांना माहिती कळवली. 15 दिवस गोयल यांनी वेळोवेळी वरील तिन्ही व्यक्तीशी संपर्क साधुन त्यांचा गहु नक्की कोठे आहे ? याबाबत विचारणा करूनही संशयीत गव्हाची चोरी झाल्यावर ठाम होते. तिघांचे वर्तन संशयास्पद वाटत असल्याने अनिल गोयल यांनी शुक्रवारी रोजी शिरपुर तालुका पोलीस ठाण्यात 31 हजार 220 किलो वजनाचा व नऊ लाख 36 हजार 600 रुपये किंमतीचा गहू चोरीबाबत तक्रार दिली होती. तालुका पोलिसांनी याप्रकरणी पवन जगदीश कुमरावत (ट्रान्सपोर्टर, शास्त्री नगर कॉलनी, गल्ली नं.1 सेंधवा, जि.बडवानी, मध्यप्रदेश), वाहन मालक आकाश प्रकाश बाविस्कर (वॉर्ड नं.24, घर नं.118, स्कुलजवळ टॉगोर बेडी, नगरपालिका सेंधवा, जि. बडवानी) व वाहन चालक राहुल संतोष जामरे (बोबलवाडी, ता.राजपूर. जि.बडवानी मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेवून विचारणा केलनंतर त्यांनी गव्हाणची विल्हेवाट लावल्याची व खोटा अपघात झाल्याची बतावणी केल्याची कबुली दिली. तिन्ही आरोपींना शनिवार, 17 रोजी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे, हवालदार संतोष पाटील, कॉन्स्टेबल योगेश मोरे, कॉन्स्टेबल संजय भोई, कॉन्स्टेबल भूषण पाटील, हवालदार चत्तरसिंग खसावद, हवालदार सागर ठाकुर, हवालदार राजु ढिसले, हवालदार संदीप ठाकरे, कॉन्स्टेबल कृष्णा पावरा, चालक कॉन्स्टेबल मनोज पाटील आदींच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !