सासर्‍याकडे आलेल्या जावयाचा तापी पात्रातून मासे आणताना अंगावर वीज पडल्याने मृत्यू


Son-in-law dies after being struck by lightning while bringing fish from a hot pot to his in-laws’ house एरंडोल (19 मे 2025) : सासरी आलेल्या जावयाचा अंगावर वीज पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. गिरणा नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी गेल्यानंतर ही घटना एरंडोल तालुक्यातील खर्ची-सुकेश्वर परिसरात घडली. शरद रामा भील (40, रा.कामतवाडी, ता.धरणगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

काय घडले नेमके ?
शुक्रवारी शरद भील हा सासरे लक्ष्मण श्रावण ठाकरे यांच्याकडे खर्ची गावात आला असताना शनिवारी दुपारी गिरणा नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी सुकेश्वर शिवारात गेला होता. मासे पकडल्यानंतर घरी परतत असताना अचानक वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत शरदला तत्काळ एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच्या छातीवर आणि कानावर जखमा आढळून आल्या आहेत. घटनास्थळी राजेश पाटील आणि महेंद्रसिंग पाटील यांनी पंचनामा केला. तपास एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !