रोटरी क्लब ऑफ भुसावळतर्फे गरजू मुलींना सायकलीचे तर महिलांना शिवण मशीन वाटप


Rotary Club of Bhusawal distributes bicycles to needy girls and sewing machines to women भुसावळ (19 मे 2025) : भुसावळ शहरातील रोटरी क्लब ऑफ भुसावळतर्फे गरजू महिलांना शिलाई मशीनचे तर शालेय विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले. शहरातील रोटरी हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी पु.ओं.नाहाटा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील उपस्थित होते.

रोटरी क्लब भुसावळचे प्रेसिडेंट अनंत आर.पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला व रोटरी क्लब समाजातील गरजूंना मदतीसाठी नेहमीच तत्पर असल्याचे सांगितले. रोटरी क्लबच्या सचिव आरती एस.चौधरी यांनी कार्यक्रमासंबधी माहिती देऊन डॉ.एस.व्ही.पाटील यांची ओळख करून दिली.





प्रमुख पाहुणे यांनी आपल्या भाषणात रोटरी क्लबसारख्या सामाजिक संस्थांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य घडते व भारताच्या उद्याच्या नागरिकांना उज्ज्वल मार्गदर्शन मिळते. रोटरी क्लबचे असिस्टंट गवर्नर गजानन ठाकुर यांनी या शिवण मशीन व सायकलींसाठी रोटरी डिस्ट्रिक्टकडुन मिळालेल्या मदतीची माहिती दिली.

या लाभार्थींना उपक्रमाचा लाभ
अनिता किरण फेगडे, नम्रता मुक्तारसिंग पाटील, हर्षाली पंकज राणे, उज्ज्वला मंगलसिंग पाटील, रंजना विशाल जैन, पदमा उत्तम सूर्यवंशी, प्रज्ञा सुधाकर मैलागीर, सरला वसंत पाटील, तिलोत्तमा अजय बोरा यांना शिलाई मशीनचा लाभ मिळाला तर विद्या सुधाकर होले, जागृती गणेश बाउस्कर, दिव्या अंबादास मोरे, अर्चना भरत वाघ, पिंकी समाधान वाघ, कविता कैलास मोरे, वैशाली सुधाकर बारेला, नीता कैलास मोरे, सोनाक्षी अरुण वाघ यांना सायकलीचा लाभ मिळाला.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला वराडसीमच्या पंडित नेहरू विद्यालयाचे संस्थाध्यक्ष ए.के.पाटील, हेड सर सुशीलकुमार खेडकर, शिक्षक संदीप भंगाले व मनोहर झांबरे, शरद फेगडे (साकरी) यांची उपस्थिति होती. रोटरी क्लबतर्फे रोटेरियन सारंग चौधरी, हेमंत नाईक, गोपाल तिवारी, संजय चापोरकर, मदन बोरकर, आशिश अग्रवाल, राजेश अग्रवाल, मंगला पाटील, वैशाली पाटील यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन डॉ.सुवर्णा गाडेकर (सोनार) यांनी केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !