वादळी पावसात चोपड्यात भिंत कोसळताच प्रौढाचा मृत्यू


Adult dies after wall collapses in Chopda during heavy rains चोपडा (19 मे 2025) : शहरात वादळी वार्‍यासह मुसळधार पावसामुळे एका घराची पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळून बाजूच्या घरावर पडल्याने एकाचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. घटनेची चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मुसा खान उस्मान कुरेशी (61, रा.सय्यद वाडा, चोपडा) असे मृताचे नाव आहे.

काय घडले चोपड्यात
मुसा खान हे परिवारासह राहत होते. चोपडा शहरात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. यात शहरातील शेतपुरा भागात एका घराची भिंत कोसळून बाजूच्या घरावर पडली. यात चार जण जखमी झाले. यात गंभीर जखमी झालेले मुसा खान कुरेशी यांचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात त्यांची पत्नी नजमाबी मुसा खान कुरेशी (59), दिलकीशबी शिराज खान शेख रियाज (35) आणि शिरीन बी इम्रान खान कुरेशी (30) हे जखमी झाले

मुसा खान यांचा मृतदेह चोपडा रुग्णालयात नेण्यात आला होता. घटनेत कर्ता पुरुष गेल्याने खान परिवारावर शोककळा पसरली आहे. घटनेची चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !