अडीच वर्षांपूर्वीच झाला प्रेमविवाह झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
A young man who had a love marriage two and a half years ago died in an accidental death अमळनेर (20 मे 2025) : तीन दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. भटू पाटील (29, भटू बाबा, मंगरूळ, ता.अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
अमळनेर तालुक्यातील मंगरुळ एमआयडीसीजवळ मंगळवारी सकाळी प्रवासी रिक्षा व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात भटू पाटील याचा जागीच मृत्यू झाला असून, रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. भटू याचा अडीच महिन्यापूर्वीच प्रेमविवाह आणि तीन दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा झाला होता. नियतीच्या मनात मात्र, काही औरच होते.
दरम्यान, आई-वडिलांना लेकाचा आणि पत्नीला नवर्याचा अपघाताची बातमी मिळताच त्यांनी एकच टाहो फोडला. या घटनेमुळे पाटील कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला असून, मित्रपरिवारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अडीच महिन्यापूर्वी झाला होता प्रेमविवाह
भटू पाटील या तरुणाचा अडीच महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच तीन दिवसांपूर्वीच त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. मात्र, नियतीच्या मनात काही औरच होते. या घटनेमुळे पाटील कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला असून, मित्रपरिवारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात दररोज अपघातांच्या घटना घडत असून यात अनेकांना जीव देखील गमवावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्यांची दुरवस्था असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती कारवी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.