अल्पवयीन मुलीचे जळगाव बसस्थानकातून अपहरण


Minor girl kidnapped from Jalgaon bus stand न्युज डेस्क । जळगाव (21 मे 2025) : नवीन बसस्थानक परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवले. याप्रकरणी मंगळवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव शहरातील एका भागात 14 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. सोमवार, 19 मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पीडीत मुलगी ही जळगावातील नवीन बसस्थानक परिसरात असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली.

हा प्रकार तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पंरतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री 8 वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चर्‍हाटे हे करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !