शिंदखेड्यातील फायनान्स कंपनीत मॅनेजरनेच केली साथीदारासह चोरी

धुळे गुन्हे शाखेकडून पाच लाखांची चोरी करणार्‍या मॅनेजरसह साथीदाराला बेड्या


Manager and accomplice commit theft at finance company in Shindkheda धुळे (21 मे 2025) : शिंदखेडा शहरातील स्पंदना फायनान्स लि. कंपनीतून चोरट्यांनी चार लाख 68 हजार 557 रुपयांची रोकड लांबवली होती. मंगळवार, 13 मे रोजी सकाळी आठ ते 10.15 वाजेदरम्यान घडलेल्या गुन्ह्याप्रकरणी शिंदखेडा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल होता. समांतर तपासात धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीद्वारे गुन्ह्याची उकल करीत ब्रॅच मॅनेजरसह त्याच्या मित्राला अटक करीत चोरी केलेली रक्कम जप्त केली आहे.

ब्रँच मॅनेजरचा डाव अयशस्वी
शिंदखेड्यातील स्पंदना फायनान्स लि. कंपनीत चोरी झाल्यानंतर ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण (28, खेडी, ता.अमळनेर, हल्ली मुक्काम लक्ष्मीनारायण कॉलनी, विरदेलरोड, शिंदखेडा) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने मित्र समाधान उर्फ पवन दगडू पाटील (35, रा.खेडी, ता.अमळनेर) याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी समाधान हा सुभाषचा मित्र असून मॅनेजरकडून चाव्या घेवून त्याने 13 रोजी चोरी करीत संपूर्ण रक्कम दिली व पसार होण्याच्या प्रयत्नात असताना नंदुरबार येथून त्यास अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, शिंदखेडा सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार, संजय पाटील, हवालदार शशिकांत देवरे, प्रशांत चौधरी, संतोष हिरे, चेतन बोरसे, सुशील शेंडे, हर्षल चौधरी, सुनील पाटील व विनायक खैरनार, चालक हवालदार कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !