अज्ञात वाहनाने उडवले : देऊरच्या तरुणाचा जागीच मृत्यू

Blown up by unknown vehicle : Deur youth dies on the spot धुळे (22 मे 2025) : अज्ञात वाहनाच्या धडकेत देऊरच्या तरुणाचा मृत्यू झाला. समाधान प्रल्हाद माळी (30, रा.देऊर खुर्द, ता.धुळे) असे मृताचे नाव आहे.
साक्री ते पिंपळनेर रोडवरील कासारे गावाच्या फाट्याजवळ भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने समाधान यासधडक दिली. अपघातानंतर त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालय व तेथून हिरे रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.