हा तर अंदाज समितीला बदनाम करण्याचा प्लॅन : अर्जुन खोतकरांचा दावा


This is a plan to defame the Estimates Committee : Arjun Khotkar claims धुळे (22 मे 2025) : धुळ्यातील गुलमोहर या रेस्ट हाऊसमध्ये अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावाने बुक असलेल्या खोलीमध्ये तब्बल एक कोटी 84 लाखांची रोकड आढळली होती. ही रोकड समितीला देण्यासाठी असल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता तर हा प्रकार म्हणजे अंदाज समितीला बदनाम करण्याचा प्लॅन असल्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले अर्जुन खोतकर?
सरकार आणि अंदाज समितीला बदनाम करण्यासाठी हा प्लॅन आखला जात आहे का? असा थेट सवाल अंदाज समितीचे अध्यक्ष आणि मंत्री अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केला. खोतकर म्हणाले की, राजकीय हेतूनिशी रचलेलं नाटक आहे.गोटे यांना असे बिनबुडाचे आरोप करण्याची जुनी सवय आहे. प्रत्येक वेळी राजकीय शिगेला नेण्यासाठी असाच प्रकार केला जातो. सरकार किंवा समितीची बदनामी करण्याचा हा कट असल्याचेही ते म्हणाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !