जानोरी गावाकडून सातोद येथे कत्तलीच्या उद्देशातून 20 गोवंश नेतांना तिघांना पकडले


Three people, including 20 cattle herders, were arrested in Satod from Janori village for the purpose of slaughter यावल (23 मे 2025) : रावेर तालुक्यातील जानोरी या गावाकडून सातोद या गावाकडे रस्त्याने कत्तलीच्या उद्देशातून 20 गोवंश तीन जण पायी नेत होते. सदर प्रकार हा गोरक्षकांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्यांना पकडले व यावल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी 2 लाख रुपये किंमतीचे हे 20 गोवंश ताब्यात घेऊन त्यांना गोशाळेत रवाना केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे नेमके प्रकरण
जानोरी, ता.रावेर या गावाकडून यावल तालुक्यातील सातोद या गावाकडे येणार्‍या रस्त्याने बारकू बुधू खामगड (45), पंडित गोपाल लकडे (43) व दादा देवा खामगड (47, तिघे रा.घाणेगाव, ता.साक्री, जि.धुळे) हे मेंढपाळ पायदळ 20 गोवंश घेऊन जात होते. गोरक्षकांनी त्यांना पकडले व कत्तलीच्या उद्देशातून सदर गोवंश ते वाहतूक करत असल्याचे सांगत त्यांनी यावल पोलिसांना माहिती दिली. यावल पोलिसांचे पथक तेथे पोहवले व त्यांनी दोन लाख रुपये किंमतीचे सदर 20 गोवंश ताब्यात घेतले आणि त्यांना मनवेल येथील रेवानंद गोशाळेत रवाना केले.


याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवलदार मोहन तायडे यांच्या फिर्यादीवरून प्राणी अधिनियम अन्वये तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे.

आम्ही मेंढपाळ व पशूपालक
आपण धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील घाणेगाव येथील रहिवासी असून मेंढपाळ आणि पशुपालन हा आमचा व्यवसाय आहे. या भागात शेत शिवारात आम्ही गुरे चराई करत फिरतोय मात्र, गैरसमजतीतून आम्हाला पकडून आमच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे यावेळी उभयंतांनी सांगितले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !