रेल्वे तिकिटांचा काळा बाजार : पावणेदोन लाखांच्या तिकीटांसह दोघे दलाल जाळ्यात

Black market in railway tickets : Two brokers caught with tickets worth Rs. 2.5 lakh भुसावळ (24 मे 2025) : रेल्वे तिकिटांची काळ्या बाजारात विक्री करणार्या दोघांच्या मलकापूरातून मुसक्या आवळण्यात आल्या. संजय चांडक व एका 17 वर्षीय अल्पवयीनाचा यात समावेश आहे. संशयीताच्या ताब्यातून एक लाख 61 हजार 535 रुपये किंमतीची तिकीटे जप्त करण्यात आली तर संशयीतांनी यापूर्वी आठ लाख 48 हजार 298 रुपये किंमतीची 159 तिकीटे काढल्याचे स्पष्ट झाले आहे.
दक्षता पथकाची कारवाई
मुंबईमधून रॅकेट चालविणार्या कुख्यात ठाकूर गँगशी दोघांचे कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवार, 22 मे रोजी मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी दलालीच्या कामात सहभागी असलेल्या संजय चांडक आणि 17 वर्षीय संशयीताला प्रवासी आरक्षण केंद्र, मलकापूर येथून ताब्यात घेत त्यांच्याकडील तिकीटे जप्त केली.