चोपडा शहर हादरले : अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाचा खून
कचरा वेचणार्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

Chopra city shaken: One killed on suspicion of having an immoral relationship चोपडा (25 मे 2025) : कचरा वेचणार्या महिलेचे दुसर्यासोबत सुत जुळल्याच्या संशयातून एकाने अज्ञाताचा डोक्यात दगड ठाकून खून केला. ही घटना शनिवार, 24 मे रोजी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीला अटक केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण
चोपडा शहरात कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणारे दोन पुरुष व एक स्त्री हे सोबत कचरा गोळा करतात. यापैकी मृत व्यक्ती आणि सोबत असणारी 35 वर्षीय महिला यांचे अनैतिक संबंध असल्याचा राग मनात ठेवत संशयीत राजेश काशीनाथ बारेला याने मृताच्या डोक्यात दगड मारून खून केल्याचा आरोप आहे.


हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे स्पष्ट झाले असून मयताची ओळख मात्र पटलेली नाही.
शहरातील पंचायत समिती सभापती निवास असणार्या स्थळी खून झाल्याचा प्रकार समोर येताच चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप व पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी धाव घेत काही तासातच आरोपीस अटक केली.
आरोपी राजेश काशीराम बारेला (33, चाचर्या, ता. सेंधवा) यास गोरगावले रोडवरून ताब्यात घेत त्याला अटक करण्यात आली असलीतरी मृताची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
