जळगावातील तरुण अज्ञात वाहनाच्या धडकेने ठार
Youth from Jalgaon killed in collision with unknown vehicle जळगाव (26 मे 2025) : भरधाव वाहनाने उडवल्याने जळगावातील दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीजवळ सोमवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडला. प्रेम धीरज ठाकूर (20, रा.शिंदे नगर) असे मयताचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
काय घडले जळगावात
जळगाव शहरातील शिंदे नगरात प्रेम धीरज ठाकूर (20) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता व टूर्स आणि ट्रॅव्हल्सचे व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तो सोमवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास शिंदे नगरातून अजिंठा चौकाकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला समोरून जबर धडक दिली.
या अपघातात प्रेम हा जागीच ठार झाला. घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.