जळगावात चौघा महिलांचा प्रताप : पत्ता न दिल्याच्या रागातून वृद्धेसह नातीला मारहाण
Four women in Jalgaon: Anger over not giving address, elderly woman and granddaughter beaten up जळगाव (26 मे 2025) : पत्ता न दिल्याच्या रागातून लहान नातीसह आजीलाच शिविगाळ करून मारहाण करण्यात आली तसेच वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची चैन तोडून नुकसान करण्यात आल्याचा प्रकार शनिवार, 24 मे रोजी सकाळी 11 वाजता घडला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण
रोहनवाडी येथे राहणार्या सुनंदा आनंद निकम (57) यांच्याकडे मंगल मुरलीधर सुरवाडे, अश्विनी शालिक सुरवाडे, गीता धनराज वाघ आणि सरिता संजय दांडगे (सर्व रा. महादेव नगर, जळगाव) या महिला आल्या होत्या. त्यांना सुनंदा निकम यांच्या नातीला शिकवणार्या पाटील मॅडम यांचा पत्ता हवा होता मात्र सुनंदा निकम यांनी पत्ता देण्यास नकार दिला. याच रागातून चौघींनी मिळून सुनंदा निकम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
आजीला मारू नका असे बोलल्याने त्यांची नात वंक्षिका हिलाही महिलांनी मारहाण केली. या झटापटीत सुनंदा निकम यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि नाकातील नथ तोडून नुकसान करण्यात आले. या घटनेनंतर सुनंदा निकम यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चारही महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र तायडे करीत आहेत.