भुसावळातील तालुका क्रीडा संकुलाची मंत्री संजय सावकारे यांच्याकडून पाहणी


Minister Sanjay Savkare inspects the Taluka Sports Complex in Bhusawal भुसावळ (27 मे 2025) : शहरातील तालुका क्रीडा संकुलाची विविध कामे पूर्णत्वाकडे आल्यानंतर या कामांची पाहणी राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी सोमवारी केली. यावेळी त्यांनी क्रीडा संकुलाच्या कामाची सविस्तर माहिती घेतली व उर्वरित कामांसाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही दिली.

भुसावळ शहरात 7 कोटी 29 लाख 45 हजार रुपयांच्या निधीतून अत्याधूनिक सर्वसमावेशक क्रीडा संकुल उभारले जात आहे. क्रीडा संकुलाच्या सुरक्षा भिंतीचे तसेच जलतरण तलावाचे काम पूर्ण झाले असून प्रेक्षक गॅलरीचे काम अंतिम टप्प्यावर आहे. इनडोअर गेम्स स्टेडियमची इमारतही पूर्ण झाली आहे.




विविध खेळांसाठी वेगवेगळी मैदाने उभारण्याचे काम सुरू
आहे. या इमारतीमध्ये काही बदल सांगितले असल्यामुळे हे कामही निधी मिळाल्यानंतर पूर्ण होईल, असे मंत्री सावकारे यांनी सांगितले.

सध्या संकुल परिसरातील जमीन समतोलीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. गॅलरी तसेच इनडोअर गेम्ससाठी हॉलचे कामही पूर्णत्वाकडे गेले आहे.

मंत्री सावकारे यांनी पाहणीदरम्यान सांगितले की, उर्वरित कामांसाठी अजून निधी आवश्यक आहे. वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून तो निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील टप्प्यात उर्वरित कामांना गती दिली जाईल. यावेळी माजी नगरसेवक प्रमोद नेमाडे, गिरीश महाजन, पिंटू कोठारी, भाजप शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, प्रवीण जवरे, राहुल तायडे, मक्तेदार ईशान दर्डा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !