महाराष्ट्रात आठवडाभर अतिवृष्टी : हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी


Heavy rains in Maharashtra for a week : Red alert issued by Meteorological Department मुंबई (27 मे 2025) : महाराष्ट्रासह चार राज्यांत अतिवृष्टी सदृश्य ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे की, ओडिशाच्या समुद्र किनार्‍यापासून दूर बंगालच्या उपसागरातील उत्तर पश्चिमेला कमी मध्यम दाबाचा बट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू उत्तरेकडे सरकण्याची आणि पुढील 48 तासात स्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.




पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या महाराष्ट्रासह चार राज्यांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केरळ, कर्नाटक आणि किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्र आणि गोवा राज्यात पुढील सहा ते सात दिवसांच्या कालावधीत अतिवृष्टी सदृश्य ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

27 ते 30 मे या काळात केरळमध्ये, 27 मे रोजी महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील पश्चिम घाट माथा आणि पायथा परिसरात, कर्नाटकातील किनारपट्टी, घाटमाथ्यावर, त्याचबरोबर तामिळनाडूनतील घाट परिसरात अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !