जळगाव गुन्हे शाखेची मोठी कारवाई : पिस्टल बाळगून दहशत निर्माण करणार्‍याला बेड्या


Major action by Jalgaon Crime Branch : Man arrested for creating terror by carrying pistol जळगाव (28 मे 2025) : पिस्टल बाळगून दहशत निर्माण करणार्‍याच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्या आहेत. जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील भिलाटी भागात मंगळवार, 27 मे रोजी दुपारी दोन वाजता ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई




जळगावच्या मेहरूण परिसरातील भिलाटी भागात दोघे गावठी पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवार, 27 मे रोजी सायंकाळी सहा वाजता कारवाई करीत विशाल संजय पवार (23, रा.भिलाटी, मेहरूण) याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 30 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त केला तर सोबत असलेला संशयित आरोपी विशाल उमरे (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) हा पसार झाला.

याप्रकरणी पोलीस नाईक किशोर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले हे करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !