महाराष्ट्र एक्सप्रेस 1 जूनपासून एलएचबी कोचसह धावणार

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी : स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने गंडवण्याचाही डाव


Maharashtra Express to run with LHB coaches from June 1 न्युज डेस्क । कोल्हापूर (28 मे 2025) : महाराष्ट्र एक्सप्रेस 1 जून पासून 18 नवीन एलएचबी कोचसह धावणार असल्याने प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखद होणार आहे.

भारतीय रेल्वेने सर्व आयसीएफ कोच हटवून त्याऐवजी एलएचबी कोच वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीतील सर्वच्या सर्व जुने रॅक बदलण्यात येणार असून ते आधुनिक लिंक हाफमन बूश डब्यांमध्ये रूपांतरित केले जाणार आहेत. या बदलामुळे पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी, सुरक्षित, सुखकर आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे.




राज्यातील सर्वाधिक लांब अंतर धावणारी ही गाडी रोज कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून (ट्रेन क्रमांक 11039) 18 एलएचबी कोच आणि नवीन संरचनेसह धावणार आहे तर गोंदिया-कोल्हापूर एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 11040) 3 जूनपासून गोंदिया रेल्वेस्थानकावरून एलएचबी कोच आणि नवीन संरचनेसह धावणार आहे. तब्बल 54 वर्षानंतर हा बदल होत आहे.

अशी असेल संरचना
1 द्वितीय वातानुकुलित कोच
4 तृतीय वातानुकुलित कोच
7 शयनयान कोच
4 सामान्य द्वितीय श्रेणी कोच
1 सामान्य द्वितीय श्रेणी कोच
1 जनरेटर कार

हे आहेत थांबे
छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, वळिवडे, रुकडी, हातकणंगले,जयसिंगपूर, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, भवानीनगर, कराड, मसूर, तारगाव, रहिमतपूर, कोरेगाव, सातारा, जरंडेश्वर, वाठार, लोणंद, निरा, जेजुरी, आंबले, घोरपडी, पुणे, उरळी, कोडगाव, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, पुणतांबा, कोपरगाव, येवला, मनमाड, नंदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, तुळजापूर, शिंदी, अंजनी, नागपूर, इतवारी, कामठी, भंडारा रोड, तुमसर रोड, तिरोडा, गोंदिया

नव्या कोचचे वैशिष्ट्य
वजनाला हलके आणि जास्त आसन क्षमता, स्वच्छ स्वच्छतागृहे असलेले हे नवीन एलएचबी कोच लावल्याने रेल्वेला आणखी गती मिळणार आहे. या गाडीतील सर्वच्या सर्व जुने रॅक बदलण्यात येणार असून ते आधुनिक लिंक हाफमन बूश डब्यांमध्ये रूपांतरित केले जाणार आहेत. या बदलामुळे पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी, सुरक्षित, सुखकर आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !