जुना वाद उफाळल्याने सब गव्हाण टोल नाक्यावर दोन गटात राडा

Two groups clash at Sab Gavhan toll plaza as old dispute flares up जळगाव (28 मे 2025) : पारोळा तालुक्यातील सबगव्हाण टोल नाक्यावर जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील आठ जण गंभीर जखमी झाले. त्यांना धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यात असलेल्या सब गव्हाण टोल नाक्यावर एक दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याच वादातून दोन गटांत पुन्हा तुफान हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात एकमेकांवर दगडांनी आणि लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला जात आहे.

काहीजण रस्त्यावर पडून असताना त्यांच्यावरही बेधडक मारहाण सुरू असल्याचे दिसत आहेत. या हाणामारीत दोन्ही गटातील आठ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी नशिराबाद टोळीतील दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
