एरंडोल शहरात मारहाणीत युवकाचा मृत्यू : पाच आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा


Youth dies after being beaten in Erandol city: Murder case filed against five accused एरंडोल (29 मे 2025) : मोकळ्या जागेत दुचाकी लावण्याच्या वादातून उफाळलेल्या वादानंतर 34 वर्षीय युवकाला काँक्रिट जमिनीवर आपटण्यात आल्याने युवक गंभीर जखमी झाला होता मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने पाच संशयीतांविरोधात आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल पाटील (34, एरंडोल) असे मृताचे नाव आहे.

काय घडले नेमके
शहरातील गाढवे गल्लीतील कैलास रतन पाटील व तुकाराम उर्फ आप्पा सीताराम पाटील यांच्यात घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत वाहन लावण्यावरून रविवारी वाद झाला होता. कैलास पाटील यांचा मोठा मुलगा अमोल पाटील (34) हा वीज वितरण कंपनीत ऑपरेटर म्हणून एक वर्षांपूर्वी नौकरीस लागला होता.





रविवारी सकाळी अमोल हा ड्युटीवरून घरी आल्यानंतर त्याने मोटर सायकल क्रमांक एमएच 19 बीएल 5114 घरासमोरील मोकळ्या जागेवर लावली होती. त्यावेळी तुकाराम पाटील यांनी मोटार सायकल लावण्यास विरोध करून शिविगाळ केली. त्याचवेळी तुकाराम पाटील यांची मुले रोहित उर्फ बंटी पाटील व आशिष पाटील व दीपक नामदेव पाटील यांनी अमोल पाटील यास लाकडी दांडक्याने तर तुकाराम पाटील यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली.

अमोलला मारहाण करीत असतांना त्याचे भाऊ सचिन पाटील, जयेश पाटील, चुलत भाऊ संजय पाटील यांनी अमोलला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. आशिष पाटील याने अमोल पाटील याचे पाय धरून त्यास घरासमोर असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर जोरात आपटल्यामुळे त्याच्या मेंदूस गंभीर दुखापत होऊन डोक्यातून रक्त वाहू लागले. संशयित रोहित पाटील याने अमोलच्या वहिनीस देखील मारहाण केली तर उषाबाई पाटील यांनी अमोल पाटील यांच्या परिवारातील सदस्यांवर दगडफेक केली.

अमोल पाटील हा गंभीर जखमी झाल्याने त्यास ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यास डोक्यास गंभीर जखम झालेली असल्यामुळे जळगाव येथे रवाना केले व जळगाव येथे उपचार सुरु असतांना त्याचे काल सकाळी निधन झाले.

याबाबत सचिन कैलास पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुकाराम पाटील यांच्याह त्यांची मुले रोहित पाटील,आशिष पाटील,पत्नी उषाबाई पाटील,पुतण्या दीपक पाटील यांचेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सं शयित रोहित पाटील, आशिष पाटील व दीपक पाटील यांना एक दिवस पोलीस कोठडी तर महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अमोल पाटीलच्या पश्चात आई, वडील, भाऊ पत्नी व पाच व दोन वर्षाची मुले आहेत. तो एक वर्षापूर्वीच वीज वितरण कंपनीत ऑपरेटर म्हणून नौकरीस लागला होता.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !