शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही : भुसावळात डीवायएसपी कृष्णात पिंगळे

There is no salvation without education : Bhusawal DYSP Krishnat Pingle भुसावळ (29 मे 2025) : शहरातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातूना काढण्यात आलेली ‘वाटा शिक्षणाच्या’ ही पुरवणी विद्यार्थी व पालकांसाठी निश्चितपणे दिशादर्शक ठरेल, यात शंकाच नाही, असा आशावाद भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंग्ळे यांनी येथे व्यक्त केला. भुसावळातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ या न्युज पोर्टलने प्रकाशित केलेल्या ‘वाटा शिक्षणाच्या’ या पुरवणीच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. शिक्षणाशिवाय तरणापोय नाही, असे सांगत त्यांनी पत्रकारीतेचा ईतिहास यावेळी उलगडून दाखवला.
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी गणेश वाघ यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देत त्यांचा पत्रकारीतेचा प्रवास अत्यंत उज्वल असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुकही केले.

यांची प्रमुख उपस्थिती
विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व ताप्तीचे चेअरमन महेशभाऊ फालक, भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ.केतकीताई पाटील, जळगावातील लाईव्ह ट्रेंड न्यूजचे संपादक शेखर पाटील (संपादक लाईव्ह ट्रेंड न्यूज), भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई संजय सावकारे, महिला समुपदेशक आरतीताई चौधरी आदींची उपस्थिती होती.
जाहिरातदारांसह मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती
द वर्ल्ड स्कूलचे संचालक व सी.ए.रोहित कोलते, भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य आर.पी.फालक, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या अनघा पाटील, शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल, वेलनेस फाउंडेशनचे निलेश गोरे, अॅड.निर्मल दायमा, चेतन जैन, मयूर अंजाळेकर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व प्रास्ताविक पर्यावरण तज्ज्ञ नाना पाटील यांनी केले तर आभार ब्रेकींगचे कार्यकारी संपादक गणेश वाघ यांनी मानले.
