जामनेर तालुक्यात खाजगी बस पेटली : सुदैवाने बचावले प्रवासी

Private bus catches fire in Jamner taluka: Passengers fortunately escaped जळगाव (30 मे 2025) : प्रवाशांना घेवून निघालेल्या खाजगी बसला आग लागल्याची घटना पिंपळगाव गाव गोलाईत, ता.जामनेर येथे घडली. या घटनेत सुदैवाने यातील पंचवीस प्रवासी, चालक व वाहक बचावले मात्र बस जळाली. मंगळवारी सकाळी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना समोर आली.
एम.पी.48 झेड.पी.5533 क्रमांकाची खाजगी बस पुण्याहून बर्हाणपूर ते धारणी जात होती. पहूर सोडल्यानंतर पिंपळगाव गाव गोलाईत गावाच्या जवळ बसने अचानक पेट घेतला. ही बाब बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाच्या लक्षात येताच त्याने आरडाओरड करून बस थांबवित सर्व प्रवासी बाहेर काढले. या दरम्यान हवा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण केले आणि प्रवासी सुखरूप स्थळी हलवित असतानाच बस पूर्ण पणे जळून खाक झाली. बसमध्ये जवळपास पंचवीस प्रवासी असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.

पिंपळगाव गोलाईत येथील पोलीस पाटील यांनी तातडीने माहिती पहूर पोलिसांना कळविताच पहूर पोलीस कर्मचारी सुभाष पाटील व आकाश देशमुख यांनी अग्निशमन शेंदुर्णी व जामनेर येथील दलाला पाचारण केले. या ठिकाणी शेंदुर्णी येथील अग्निशमन दलाचे शरद बारी, ईश्वर सोणवने, जहिर तडवी, तसेच जामनेर अग्निशमन दलाचे राजेंद्र सोनार, पवन शिंदे, प्रशांत सुतार, मयूर यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. यादरम्यान पिंपळगाव गोलाईत येथील सौरभ राजपूत, हरिभाऊ राजपूत, सगर शिसोदे, दीपक राजपूत व आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी सागर पाटील व गावकरी यांनी मोलाचे मदत कार्य केले.
संतोष, सोलंकी रा.उडी, गंगाधर मांगीलाल वायफुले, अर्जुन नार्वे, दिलीप सोलंकी, संतोष डावर, जितेंद्र सोलंकी, आशा सावरकर, मुकेश डिकार,सुनील डावरे, भिलवलकर, ऋत्विक पारेकर,पुजा वासकुले,प्रमिला डावर, राजवंती डावर, सुनिता सोलंकी, भारती राठोड, सुनिता मोरले,चालक अजय चोपे व वाहक। दिपक सर्व राहणार बर्हाणपूर, धारणा, खंडवा, मोंद्रा,उडी येथील असल्याचे सांगितले आहे. उर्वरित प्रवासी भयभीत झाल्याने मिळेल त्या वाहनाने जामनेरकडे रवाना झाले.
